Breaking News

Ek Brass mhanje kiti square foot एक ब्रास म्हणजे किती स्क्वेअर फुट

दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या प्रकारची मोजमाप पाहतो, असेच एक मोजमाप म्हणजे ब्रास. Brass हे एकक माती, खडी, वाळू, इत्यादी मोजण्यासाठी साठी वापरले जाते. कित्येक वेळा प्रश्न पडतो कि Ek Brass Mhanje kiti square foot? ब्रास म्हणजे काय? तर एक ब्रास म्हणजे 100 square foot अथवा 100 चौरस फूट. थोडक्यात सांगायचे झाले तर शंभर स्क्वेअर फुट ला एक ब्रास असे म्हणतात.

brass mhanje kiti
Brass mhanje kiti

Brass kase kadhayache | 100 square foot mhanje kiti| brass mhanje kay| ek brass mhanje kiti foot| brass kadhnyache sutra| ब्रास म्हणजे काय

Ek Brass mhanje kiti हे कसे काढायचे

Brass kase kadhayache: ब्रास चे गणित अगदी सोपे आहे, Ek brass काढण्यासाठी 10×10 म्हणजे दहा बाय दहा चा गुणाकार करावा लागतो. गुणाकार केल्यानंतर उत्तर येते 100 चौरस फूट. “100 चौरस फूट” यास पृष्ठभागासाठी brass म्हणता येईल. हे जरी ब्रास च्या श्रेणीमध्ये येत असले तरी अजून एक गुणाकार करावा लागतो तो म्हणजे 10x10x1. कारण प्रत्येक वेळेस पृष्ठभागच मोजावा लागतो असे नाही. काही वेळा एखादा खड्डा, वाळू, रेती, खडी इत्यादी प्रकारचे मटेरिअल मोजावे लागते.

How to calculate Brass in Marathi

Brass काढण्यासाठी तुम्ही येथे सांगितलेली सोपी पद्धत वापरू शकता. समजा तुम्हाला ट्रोली मधील वाळू मोजायची आहे. तर पहिल्यांदा तुम्हाला ट्रोलीचे लांबी रुंदी मोजावी लागेल. उदारणार्थ, लांबी 10 फुट रुंदी 5 फूट आणि उंची 2 फुट तर 10x5x2 = 100 म्हणजे एक ब्रास. (जेंव्हा लांबीxरुंदी मध्ये उंचीचा गुणाकार केला जातो तेंव्हा त्याचे उत्तर घनफुट मध्ये मोजले जाते.)

ब्रास काढण्यासाठी अजून काही उदाहरणे पाहूयात. 100 square foot mhanje kiti

  • 10×10 = 100 चौ. फुट म्हणजे एक ब्रास (पृष्ठभाग जसे घरामध्ये बसवलेली फ्लोरिंग फरशी किंवा भिंत)
  • 10x10x1 = 100 घन फुट म्हणजे एक ब्रास ( वाळू, माती, खडी इत्यादी)
  • 10x10x2 = 200 घन फुट म्हणजे दोन ब्रास
  • 10x5x3 = 150 घन फुट म्हणजे दीड ब्रास

एक ब्रास म्हणजे किती बाय किती

Ek brass mhanje kiti foot:एक ब्रास म्हणजे (10×10 = 100 चौ. फुट) दहा बाय दहा. 100 square foot एक ब्रास म्हणतात. ब्रास काढण्याचे सूत्र: लांबीxरुंदीxउंची= ब्रास

समजा 12 लांब 6 रुंद आणि 5 फुट खोल असा एक खड्डा काढल्यानंतर त्यामधून किती ब्रास माती बाहेर टाकली जाईल किंवा तो खड्डा किती ब्रास होईल हे कसे काढता येईल ते पाहू.

ब्रास काढण्याचे सूत्र = लांबीxरुंदीxउंची= ब्रास

12x6x5 = 360 घन फुट म्हणजे 3.6 ब्रास

हे पण वाचा: Enterprise meaning in Marathi

KP

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *