Breaking News

Himachal Pradesh Tour Guide in Marathi हिमाचल प्रदेश पर्यटन स्थळे

जर तुम्ही हिमाचल प्रदेशला पिकनिक (Picnic) साठी जाण्याचा विचार करत असाल तर हि पोस्ट Himachal Pradesh Tour Guide in Marathi खास तुमच्या साठी आहे.नमस्कार, marathit.net मध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग निघूया Himachal Pradesh Tour वर.

Himachal the Beauty: हिमाचल प्रदेश हे उत्तर भारतातील पर्यटकांच्या सर्वाधिक पसंतीचे राज्य आहे. येथे हिमालयातील मनमोहक पर्वतरांगा- दऱ्या-खोऱ्यांबरोबरच अनेक तलाव, प्राचीन मंदिरे, बौद्ध धर्मियांची मंदिरे, ऐतिहासिक वास्तू वगैरे आहेत.या लेखामध्ये आपण धर्मशाळा, मॅकलीओडगंज, पालमपूर, बिर-बिलींग अशी पाच ते सहा दिवसांची ट्रिप कशी करावयाची याविषयी माहिती जाणून घेऊ.

हिमाचल प्रदेश मधील पर्यटन स्थळे Picnic spots in Himachal Pradesh

पाच ते सहा दिवसाच्या Picnic Trip साठी काही हिमाचल प्रदेश पर्यटन स्थळे | Himachal Pradesh picnic spots in Marathi | Himachal Pradesh Tour guide in Marathi

धर्मशाळा : भारतातील लहान ल्हासा Dharmshala Lhasa

हिमाचल प्रदेशमधील कांग्रा जिल्ह्यामध्ये कांग्रा शहरापासून १८ कि.मी अंतरावर व समुद्रसपाटीपासून ४ हजार ८०० फूट उंचीवर धर्मशाळा (Dharmshala) नावचे हे सुंदर व निसर्गरम्य असे गाव वसलेले आहे. धर्मशाळेची विभागणी दोन भागामध्ये करता येते. धर्मशाळेपासून ३ कि.मी. अंतरावर असलेले मॅकलीओडगंज (McLeodganj) हे गाव समुद्रसपाटीपासून ६ हजार ९०० फूट इतक्या उंचीवर वसलेले आहे. बौद्ध धर्मगुरू दलाई लामा (Dalai Lama) हे इ.स. १९५९ साली त्यांच्या अनुयायांसह भारतामध्ये आले.

Dalai Lama भारतात आल्यानंतर त्यांनी राहण्यासाठी म्हणून धर्मशाळेची निवड केली. हिमालयातील धवलाधार पर्वतरांगांच्या पायथ्याशी असलेल्या या सुंदर गावाचा तेव्हापासून कायापालटच झाला. त्यामुळे या गावास आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले. दलाई लामांचे वास्तव्य येथेच असल्यामुळे येथूनच ते चीनमधील तिबेट प्रांताचे निर्वासन सरकार चालवतात. दलाई लामांचे वास्तव्यानंतर हे शहर समृद्ध अशा तिबेटियन संस्कृतीशी जोडले गेले. या शहरास आध्यात्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे. धर्येमशाळा थील योग व विपश्यना केंद्र जगप्रसिद्ध आहे.

मैक्लोडगंज McLeod Ganj मधील प्रसिद्ध ठिकाणे

धर्मशाळेपासून ३ कि.मी. अंतरावर व समुद्रसपाटीपासून ६ हजार ९०० फूट इतक्या उंचीवर मैक्लोडगंज नावाचे थंड हवेचे ठिकाण वसलेले आहे.बौद्ध धर्मातील काही महत्त्वाचे मठ उदा. नामगॅल, त्सुग्लागखांग वगैरे येथून जवळच आहे. तसेच याठिकाणी भागसू आणि गल्लू नावचे अतिशय सुंदर असे धबधबे देखील आहेत.

McLeod Ganj मार्केटदेखील खूप प्रसिद्ध असून येथे अस्सल तिबेटियन हस्तकला, कपडे वगैरे वस्तू अतिशय वाजवी किमतीमध्ये मिळतात. मार्केटला समांतर असलेल्या एका गल्लीमध्ये धर्मशाळा व मॅकलीओडगंज येथे निर्वासित असलेल्या मूळच्या तिबेटियन लोकांच्या अनेक खानावळी आहेत. जेथे मोमोज, ठुक्का वगैरे असे चवदार तिबेटियन पदार्थ खायला मिळतात. पर्यटकांना राहणेसाठी मैक्लोडगंज (McLeod Ganj) हे अधिक सोईचे असून येथे जेवणासाठी व राहण्यासाठी अनेक हॉटेल्स, हॉस्टेल्स वगैरे उपलब्ध आहेत.

धर्मकोट : Dharamkot हिमाचल प्रदेश

मॅकलीओडगंजपासून ५ कि.मी. अंतरावर असलेले हे डोंगराळ खेडे अलीकडील काळामध्ये हिप्पी लोकांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. धर्मकोट हे एक विलक्षित असे ठिकाण असून तेथे जाणे काहीसे असामान्य पद्धतीचे (धोकादायक नाही) असलेकारणाने तिथे फक्त तरुण पर्यटकांचा कल दिसून येतो.अलीकडील काळामध्ये वाढत चाललेल्या इस्त्राईल नागरिकांच्या संख्येमुळे धर्मकोटला आता भारतातील छोटे टेलअव्हीव असे म्हटले जात आहे. (Himachal Pradesh Tour guide in Marathi)

dharmkot himachal pradesh mahiti marathi

धर्मकोटची विभागणी ही वरचा (Upper Dharamkot) धर्मकोट व खालचा (Lower Dharamkot) धर्मकोट अशी होते. टॅक्सीने अथवा मोटरसायकलवरून खालच्या (लोअर) धर्मकोटच्या पायथ्यापर्यंत जाता येते. या गावामधील आतील गल्ल्या ह्या अतिशय अरूंद व छोट्या आहेत. ज्याप्रमाणे गोवा येथे बीच शॅक्स असतात तशा प्रकारचे कॅफेज् धर्मकोट येथे पहावयास मिळतात. अनेक कॅफेमधून हिमालयातील नयनरम्य अशा सूर्यास्ताचे दर्शन होते.

बिर बिलींग Bir Billing

समुद्रसपाटीपासून ६ हजार फूट उंचीवर व हिमालयातील जोगींदरनगर खोऱ्यात बिर आणि बिलींग ही गावे वसलेली आहेत. दोन्हीही गावांवर तिबेटियन संस्कृतीचा पगडा दिसून येतो. ६ या गावांना विशिष्ट ओळख ही जर मिळाली ट असेल तर ती पॅराग्लायडींगमुळेच !बिर आणि बिलींग हे पॅराग्लायडींगसाठीजगप्रसिद्ध आहेत. बिलींग येथून पॅराग्लायडर्स उड्डाणाची (टेकऑफ) सुरुवात करतात व बिर येथे उतरतात. बिर आणि बिलींगमधील उंचीचा फरक हा २ हजार ५०० फूट आहे.

bir billing mahiti marathi
Bir billing

पॅराग्लायडींग बरोबरच ट्रेकर्स लोकांमध्येसुध्दा बिर- बिलींगचे (Bir Billing) विशेष असे आकर्षण आहे. येथील बिलींग- राजगुंधा-बारोद ट्रेक, छोटा बंगाल- बड़ा बंगाल वगैरे ट्रेक फार प्रसिद्ध आहेत. येथे कॅम्पिंगचीसुद्धा सुविधा उपलब्ध आहे. अनेक तरुण बिर येथील डोंगरावर टेन्टमध्ये राहण्याचा मनमुराद आनंद घेतात.

पालमपूर : Palampur

पालमपूर हे हिमाचलमधील महत्त्वपूर्ण असे शहर आहे. या शहरास पाइन व देवदार झाडांच्या दाट जंगलाचा वेढा आहे. तसेच येथे चहाचे मळे देखील आहेत. या गावातून धवलाधार पर्वतरांगांचा सुंदर असा नजारा दिसून येतो.आता आपण जाणून घेऊया ट्रिपमध्ये काय काय पाहता येईल.

places to visit in palampur
palampur photos
  • हिंदू मंदिरे- वज्रेश्वरीमाता मंदिर, चामुंडादेवी मंदिर, भागसू नाग मंदिर,गल्लूदेवी मंदिर.
  • बौद्ध मंदिरे व मोनॅस्टरी -दलाई लामा मंदिर, कालचक्र मंदिर, नामग्याल मोनॅस्टरी, नेच्युंग मोनॅस्टरी, नॉर्बुलींगका इन्स्टिट्यूट.
  • ट्रेकींग व इतर activity – त्रिऊंद ट्रेक, पॅराग्लायडींग, रोप-वे.
  • इतर रमणीय ठिकाणे – चहाचे मळे, दाल लेक, नड्डी व्ह्यू पॉईंट, धर्मशाळा येथील क्रिकेट स्टेडियम, भागसू धबधबा, गल्लू धबधबा, मॅकलीओडगंज मार्केट, सेंट जॉन्स विल्डरनेस चर्च.
  • कलासंबंधी- धर्मकोट पॉटरी स्टुडिओ, अॅन्ड्रीएट्टा पॉटरी, नाम आर्ट गॅलरी इ.
  • खाद्यसंस्कृती – तिबेटीयन पदार्थ – मोमोज, – थुक्का, ब्लॅक चॉइस सूप, टिंगमो, थेन्थुक इ.
  • हिमाचली – कांगराधाम, राजमाचावल, मद्रा, तुडकीभात, सिद्धू, मिठा, काळे हरभरा आंबट, भे इ.
  • आरोग्य – पद्मश्री डॉ. येशी धोंदोनयांचे कॅन्सर उपचारासाठीचे तिबेटियन चिकित्सालय.
  • अध्यात्मिक केंद्र – धम्मशिखरविपश्यना केंद्र, तुशिता ध्यान केंद्र (Tushita Meditation Center)

हे पण वाचा: महाबळेश्वर माहिती: ठिकाणे, हॉटेल्स, पॉइंटस

प्रवासाचा कार्यक्रम Himachal Pradesh trip Program

हिमाचल प्रदेश ट्रीपसाठी प्रवासाचा कार्यक्रम खालील पद्धतीने करावा. जेणेकरून तुमची Himachal Tour सुखरूप होईल.

हिमाचल प्रदेश ट्रीप साठी कसे जावे?

या ट्रिपसाठी विमान अथवा रेल्वेने प्रवास करणे सोईचे ठरेल. रेल्वेने पंजाबमधील पठाणकोट स्टेशन येथे सर्वप्रथम यावे लागेल व तेथून स्थानिक बस अथवा टॅक्सीने धर्मशाळा येथे यावे. पठाणकोट ते धर्मशाळा हे अंतर ८० कि.मी. इतके आहे. विमानाने यावयाचे झालेस कांग्रा विमानतळ हे धर्मशाळेपासून १३ कि.मी. अंतरावर आहे.

Himachal Pradesh Places to stay हिमाचल प्रदेश राहण्याची व्यवस्था

मॅकली ओडगंज – हे राहणेसाठी अधिक सोईस्कर असलेमुळे पर्यटकांनी येथील हॉटेल राहणेसाठी निवडावे. हॉटेलमधील मुक्काम हा तीन दिवसांचा असावा. धर्मकोट येथे रहावयाचे असलेस आपले सामान हलके असावे.

ट्रिपच्या दिवसागणिक कार्यक्रमाचे नियोजन पुढीलप्रमाणे करावे.

दिवसागणिक ट्रीप साठी Himachal Pradesh Tour Guide in Marathi

पहिला दिवस Himachal pradesh Tour Day One

सकाळचे सत्रामध्ये मॅकलीओडगंज मार्केट, कालचक्र मंदिर, दलाई लामा टेम्पल कॉम्प्लेक्स, नामग्याल मोनॅस्टरी ही सर्व ठिकाणे पायी करता येतात. दुपारचे सत्रामध्ये टॅक्सीने प्रथम सेंट जॉन्स विल्डरनेस चर्च पाहिल्यानंतर दाल लेक मार्गे नड्डी व्ह्यू पॉईंट येथील सूर्यास्त दर्शनासाठी जावे.

दुसरा दिवस Himachal pradesh Tour Day Two

सकाळी भागसू नाग मंदिराकडे जावे व येथूनच जवळ असलेल्या भागसू धबधब्याचा आनंद घ्यावा. दुपारच्या सत्रामध्ये धर्मकोट येथे जावे व येथील छोट्या गल्ल्यांमधून वरच्या (अप्पर) धर्मकोटपर्यंत पायी प्रवास करावा. वाटेत अनेक कॅफेज्, हिप्पी कपडे वगैरे साहित्यांची दुकाने आहेत. धर्मकोट येथील अनेक कॅफेमधून सूर्यास्त दर्शन पहावयास मिळते.

तिसरा दिवस त्रिउंड ट्रेक Third Day Himachal Pradesh tour

हिमालयातील सर्वसामान्यांना सहज शक्य होईल अशा ट्रेकमध्ये त्रिऊंड ट्रेकची गणना केली जाते.

त्रिउंड ट्रेक ला कसे जायचे? How to reach Triund Trek in marathi

ट्रेकची सुरुवात गल्लूमाता मंदिरापासून होते व धर्मकोट येथून गल्लूमाता मंदिरापर्यंत टॅक्सीने जाता येते. गल्लू मंदिरापासून त्रिकंद ८ कि.मी. अंतरावर •असून सकाळी सातच्या दरम्यान ट्रेकची सुरुवात केलेस साधारणपणे ४-५ तासात त्रिऊंद टॉप येथे वरती पोहोचता येते. त्रिऊंद टॉप समुद्रसपाटीपासून ९ हजार५०० फूट उंचीवर असून येथून धवलाधार व इंद्रहार पर्वतरांगा, दऱ्याखोऱ्यांची सुंदर दृश्ये दिसतात.

himachal pradesh paryatan sthale
Places to stay in Triund Trek त्रिउंड ट्रेक ला राहण्याची व जेवणाची सोय

येथे राहणेसाठी टेन्टस् उपलब्ध असून खाण्यापिण्यासाठी दोन कॅफेज् आहेत. एका टेन्टमध्ये दोन व्यक्ती राहू शकतात. राहणेसाठी प्रति व्यक्तीस ५०० रु. ते १००० रु. इतका आकार सिझननुसार घेतला जातो. ज्यांना रहावयाचे नसते ते दुपारी चार नंतर परत जातात, त्यामुळे ते सूर्यास्त दर्शन पहावयास मुकतात. धर्मकोटपासून त्रिऊंदला जाणे-येणेसाठी गाईड उपलब्ध असतात. अंधारात गाईड सोबत नसताना एकट्याने त्रिऊंदवरून खाली येण्याचे साहस करू नये.

ज्यांना त्रिऊंद ट्रेकला जावयाचे नसेल त्यांनी गल्लूपासूनच साधारण ४० मिनिटे ट्रेक करावयाचे अंतरावर एक अतिशय सुंदर व कमी गर्दी असलेला धबधबा आहे ज्याचा आनंद घ्यावयास हरकत नाही.

इंद्रहारपास

पट्टीचे अनुभवी ट्रेकर्स हे त्रिऊंदपासून पुढे इंद्रहारपास इथेपर्यंत जातात. इंद्रहारपास येथे बर्फ असतो व ते ठिकाण समुद्रसपाटीपासून १४ हजार फूट उंचीवर आहे. इंद्रहारपासला जाताना व येताना त्रिऊंद येथे एक मुक्काम करणे गरजेचे आहे. त्यामुळे हा ट्रेक किमान ३ रात्रींचा आहे. इंद्रहारपासला जाताना वाटेत फक्त एक कॅफे असून खाणे-पिणेची व्यवस्था व मुक्काम हे सर्वकाही स्वतः करणे गरजेचे आहे.

चौथा दिवस Fourth day of Himachal pradesh Tour

मॅकलीओडगंज येथील हॉटेल सकाळी चेक आऊट करून पालमपूर येथे यावे. मॅकलीओडगंज ते पालमपूर प्रवास करताना प्रथम नेच्युंग मोनॅस्टरी व नंतर क्रिकेट स्टेडियम व नॉर्बुलींगका इन्स्टिट्यूटला भेट द्यावी. त्यानंतर संध्याकाळी हॉटेलमध्ये विश्रांतीसाठी जावे. या प्रवासासाठी टॅक्सी ठरविणे योग्य ठरेल. टॅक्सीचा येणारा खर्च किमान १५०० ते ३५०० रुपये इतका सिझनसाठी आकारला जातो.

पाचवा दिवस Himachal Pradesh

वज्रेश्वरीमाता मंदिर, चामुंडादेवी मंदिर आणि कांग्रा किल्ला पहावयाचे झाल्यास एक दिवसासाठी टॅक्सी ठरविणे योग्य ठरेल. तसेच बसमार्गेही प्रवास करणे सहज शक्य होईल.

सहावा दिवस (बिर-बिलींग)

Bir Billing the paragliding capital of India: Bir Billing हे भारतातील सर्वात प्रसिद्ध Paragliding Place आहे. सकाळी लवकर बिर-बिलींग येथे जाऊन पॅराग्लायडींगचा मनसोक्त आनंद घ्यावा आणि तेथे रहावयाचे नसलेस संध्याकाळी परत येऊन ट्रिपचा शेवट करावा.

KP

One thought on “Himachal Pradesh Tour Guide in Marathi हिमाचल प्रदेश पर्यटन स्थळे”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *