
मराठीत एक म्हण आहे ” ज्याची जळते त्यालाच कळते” या ठिकाणी शब्दशः अर्थ घेऊ नका किंवा दुसरा अर्थ काढू नका. परंतु विषय, मुळव्याध म्हणजेच Piles चा असेल तर हे पूर्ण सत्य आहे. कारण मुळव्याध असा आजार आहे ज्यामध्ये भयंकर त्रास होतो. म्हणून Piles Treatment in Marathi मूळव्याध पासून एका दिवसात आराम कसा मिळवायचा यावर हा लेख आहे.
येथे सांगितलेला Piles Treatment in Marathi उपाय हा माझ्या वैयक्तिक अनुभव आहे. आणि माझा उपाय डॉक्टरांना कळल्यानंतर तेही अचंभित राहिले. कारण मी माझा अनुभव त्यांचाशी share केला होता. आणि आज तुमच्या सोबत हि share करू इच्छितो.
Mulvyadh lakshane | mulvyadh gharguti upay | Piles laksahne | Piles gharguti Upay | PIles treatment | Piles Doctor near Me | मुळव्याध घरगुती उपचार | उष्णता कमी करण्याचे उपाय | mulvyadh cream
त्याचप्रमाणे हा मुळव्याधचा उपाय प्रत्येकासाठी करागर असेल याची शास्वती मी देऊ शकत नाही. कारण मी डॉक्टर नाही किंवा आयुर्वेदिक औषधे देणारा माणूस हि नाही. परंतु आज पर्यंत ज्यांना ज्यांना हे औषध सांगितले आहे त्यांना मुळव्याध पासून आराम मिळाला आहे हे मात्र नक्की. काही शंका असल्यास comment Box मध्ये कळवा. माझ्या परीने तुम्हाला नक्की मदत करेन. चला तर मग सुरु करूया.
What is a Piles in Marathi
सुरु करण्यापूर्वी सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे What is a Piles in Marathi ? तर Piles ला मराठी मध्ये मुळव्याध म्हणतात. म्हणजे लोअर रेक्टम आणि गुदद्वारातील सुजलेल्या व फुगलेल्या नसा. मूळव्याध आन्तरिक (रेक्टमच्या आत विकसित होणारे) किंवा बाह्य (गुदद्वाराशेजारील त्वचेच्या खाली असणारे) असू शकते.
मूळव्याध ची लक्षणे : Symptoms of Piles in Marathi
Symptoms of Piles in Marathi: काही जणांना मूळव्याध ची लक्षणे माहित नसतात. त्यासाठी या ठिकाणी Piles ची लक्षणे सांगितली आहेत. खालील पैकी मूळव्याध ची कोणती लक्षणे तुम्हाला जाणवतात हे तुम्ही माहित करून घेऊ शकता.
- मल निःसारणानंतर लाल रक्त शौचालयात पडणे हे मुळव्याध चे महत्वाचे कारण मानले जाते.
- त्याच प्रमाणे मांसाहार अथवा उष्ण पदार्थ खाल्यानंतर गुदद्वारेमध्ये आग होणे.
- गुदद्वाराभोवती अशांती किंवा लालसर पण किंवा खाज जाणवणे
- मल निःसारणावेळी वेदना होणे.
- गुदद्वारातून बाहेर निघालेले एक कोंब लागते.
- Piles चे प्रमाण जास्त असल्यास रक्तस्राव होतो. यामूळे मलावर नियंत्रण नसल्याचे जाणवते.
Piles Treatment in Marathi – मुळव्याध चा उपचार
मुळव्याध चा उपचार (Piles Treatment in Marathi) पाहण्या अगोदर माझा तुम्हाला माझा अनुभव सांगू इच्छितो. Mulvyadh Gharguti Upay
माझ्या वडिलांना मुळव्याध चा त्रास सुरु झाला. सुरवातीला मी जास्त लक्ष दिले नाही. कारण या अगोदर मला स्वतःला हा त्रास काही झाला नाही. परंतु जस जसे दिवस पुढे गेले वडिलांचा Piles चा त्रास वाढत गेला. त्यांना नीट बसायला हि येत न्हवते. म्हणून त्यांना मी थंड पदार्थ खाण्याचा सल्ला दिला. आणि म्हणालो, ” उष्णता कमी झाली कि होईल त्रास कमी”. त्यांनीही तसेच केले. पण त्रास कमी झाला नाही.
मग मी गुगल वर piles doctor near me असे शोधायला लागलो. आणि एक डॉक्टर मला सापडले Dr. गव्हाणे. त्यांच्याकडे Piles Treatment चालू केली. पहिल्याच दिवशी दोन हजार रुपयांची औषधे डॉक्टरांनी दिली. मला वाटले एवढी महाग औषधे आहेत म्हणजे फरक नक्की पडणार. आणि तो पडला.
पण मला माहित न्हवते कि तो फरक औषध पोटात असे पर्यंतच आहे म्हणून. मी हि वैतागलो होतो. कारण नंतर तीन चार इतर दवाखाने दाखवले होते. परंतु कसलाही फरक नाही. पण एक दिवस…
वडिलांनी स्वतःच केला मुळव्याध वर घरगुती उपाय
मुळव्याध वर घरगुती उपाय हा त्यांचा स्वतः चा नसला तरी तो त्यांच्या मित्राकडून त्यांना मिळाला होता. आणि ते दुसरे काही नसून कूडकूडी चा पाला ! कुडकुडी हि रानात वाढणारे एक प्रकारची वेल आहे. फक्त ते जमिनीवर पसरते. कदाचित, तुम्हीही खूप वेळा पहिले असेल. परंतु या वनस्पतीची वेगवेगळ्या भागात वेगवेगळी नावे आहेत जसे दगडी पाला वनस्पती, कंबरमोडी इत्यादी. आमच्या भागात या वनस्पती ला कूडकूडी म्हणतात. English मध्ये Tridax procumbens म्हणतात.

तर कूडकूडी च्या पाल्याचा रस त्यांनी सकाळी अनुशापोटी 2 ते 3 दिवस पिला. पहिल्याच दिवसा पासून त्यांचा त्रास कमी झाला. आणि या गोष्टीला अंदाजे 6 ते 7 वर्ष होऊन गेली. अजूनपर्यंत कसलाही मुळव्याध चा त्रास वडिलांना नाही.
दोन वर्षा पाठीमागे मलाही थोडा त्रास होत होता. मीही तोच उपाय केला माझाही Piles प्रोब्लेम निकाली लागला. याच प्रमाणे माझ्या सहकारी ( एक मित्र आणि 2 माझ्या सोबत काम करणारे) त्यांचाही मुळव्याध चा त्रास कमी झाला.
मुळव्याध साठी उपचार Piles treatment in Marathi
वरील अनुभवावरून मुळव्याध साठी उपचार सांगत आहे. [Piles treatment in Marathi]
- कुडकुडी अथवा कंबरमोडी चा ताझा आणि पाला स्वच्छ धुवून घ्या.
- या पाल्याला वाटून रस काढा.
- आणि सकाळी अनुशापोटी प्या. ( रस पिल्यानंतर किमान अर्धा तास काही खाऊ अथवा पिऊ नये.
- किमान तीन दिवस हे करा जास्तीत जास्त पाच दिवस.
हा प्रयोग केल्यानंतर Piles च्या तीव्रतेनुसार १ ते २ दिवसात फरक जाणवायला सुरवात होईल.

टीप: जर सदरचा उपचार हा माझा वयक्तिक अनुभव आहे. कारण वर सांगितलेली वन्स्पती खूप औषधी आहे. तिचे इतरही बरेच उपयोग आहेत. काही शंका असल्यास Comment करा. अथवा तुम्ही डॉक्टरांकडून .Piles Treatment घेऊ शकता.
निष्कर्ष
Piles होणे हे अतिशय त्रासदायक आहे. लक्षणे ओळखून त्वरित उपचार करावेत. मुळव्याध चे Symptoms कमी अथवा मध्यम असतील अशावेळी वरील उपचार करण्यास हरकत नाही. परंतु मुळव्याध खूप जुना आह आणि तुम्हाला त्रास खूप जास्त असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. थोडक्यात सांगायचे झाल्यास कमी तीव्रता असणारा mulvyadh gharguti उपाय केल्यास कमी होऊ शकतो.