हापूस आंबा कसा ओळखायचा
चांगल्या गुणवत्तेच्या हापूस आंब्याला एक नैसर्गिक सुंगध असतो
इतर भागातून येणारे आंबे जे हापूस आंब्यासारखे दिसतात मात्र त्याला अजिबात गंध नसतो किंवा फार क्वचित येतो.
नैसर्गिकरित्या पिकवलेले आंब्यांना स्पर्श केल्यानंतर ते मऊ आणि मुलायम असल्याचे जाणवतात
पिकलेल्या हापूस आंब्याची साल आपण सहजरित्या हाताने काढू शकतो. तसेच या सालीला आंब्याचा गर लागत नाही.
एका मोठया भांड्यात पाणी घेऊन त्यात आंबा बुडवा, जर आंबा बुडाला तर तो नैसर्गिकरित्या पिकलेला आहे
शिवाय जर आपली नजर चांगली असेल तर आंब्याच्या पेटीतील वर्तमानपत्रातूनही त्याची ओळख स्पष्ट होते.
कुठले वर्तमानपत्र वापरले आहे त्यावरून सुद्धा तो आंबा कुठल्या भागातून आला आहे हे कळते
रासायनिक पद्धतीचा वापर करुन पिकवलेले असल्याने ते सुगंध देत नाहीत.
Visit Marathit.net